उमाजी राजांनी भारतीयांच्या मनात सर्व प्रथम क्रांतीची ठिणगी पेटवली : राजेश काकडे
आद्य क्रांतिवीर उमाजीराजेंची २३२ वीजयंती उत्साहात साजरी
नीरा दि.७
इंग्रजांनी देश काबीज केल्यानंतर त्यांच्या विरोधात पहिली क्रांतीची ठिणगी आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांनी पेटवली आणि त्याच ठिणगीमुळे पुढे अनेक वर्ष स्वतंत्र लढ्याचा यज्ञ पेटत राहिला. त्यातुन पुढे जाऊन देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे या आद्य क्रांतिवीराला आपण कायमच नतमस्तक होऊन नमन करायला पाहिजे. उमाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने आंगिकृत केले.असे प्रतिपादन नीरेच आदर्श उपसरपंच राजेश काकडे यांनी आज नीरा येठी बोलताना केले.
नीरा येथे आद्य क्रांतिवीर उमाजी राजे यांची २३२ वी जयंती साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजता नीरा गावच्या सरपंच तेजश्री काकडे आणि उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते उमाजी राजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नीरा येथील अनेक निरेकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण,उपसरपंच राजेश काकडे आणि सरपंच तेजश्री काकडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी ग्रामांचायात सदस्य अभी भालेराव,अनाता शिंदे, विजय शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सुनील जाधव ,सुरेश चव्हण ,सुनील पाटोळे, हणमंत चव्हाण, ग्रामविकास अधिकारी राऊत इत्यादी सह अनेक नागरिक उपस्थित हो
ते.