भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुक्यामध्ये येणाऱ्या निवडणुकांत प्रभावी कामगिरी करेल : सचिन लंबाते
भाजप जिल्हा चिटणीसपदी संजय निगडे व जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या सरचिटणीसपदी बाळासाहेब भोसले यांची नियुक्ती.
पुरंदर :
तालुकाध्यक्ष सह विविध आघाड्या, मोर्चांवर पुरंदर तालुक्यातील अनेक दिग्गजांची वर्णी लागलेली आहे. या नव्या नियुक्त्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अधिक जोमाने काम करणे शक्य होईल. येणारे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात बूथ सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे करण्यात येईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी सर्वसामान्यांना लाभदायक असणाऱ्या योजना आणलेल्या आहे. त्या योजना त्याचबरोबर राज्यामध्ये शिंदे, फडणवीस सरकारने केलेल्या नवनवीन अनेक योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे. त्याचा लाभ त्यांना मिळवून देणे या व अशा प्रकारची अनेक कामांचे प्रभावी नियोजन करून तेच गावागावांमध्ये यशस्वीपणे पोहोचविण्याचे काम हा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथचा अध्यक्ष प्रामाणिकपणे करत असून त्यामुळे अनेक योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारणी, जिल्हा चिटणीस म्हणून संजय निगडे व जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या सरचिटणीस पदी बाळासाहेब भोसले यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम नीरा शहर भाजपाच्या वतीने घेण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते बोलत होते.
मिशन लोकसभा २०२४ ची पूर्व तयारी म्हणून पुणे जिल्हा भाजप कार्यकारिणीत संघटनात्मक बदल करण्यात आले. गुळूंचे येथील रहिवासी तसेच पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संजय काका निगडे यांची पुणे जिल्हा ग्रामीण भाजपा चिटणीसपदी व निरा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले यांची पुणे ग्रामीण भाजपा अनु.जाती मोर्चा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल नीरा शहर भाजपाच्या वतीने प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष सचिनजी लंबाते, नीरा शहर अध्यक्ष शामराजे कुंभार, सासवडे तात्या, जेष्ठ मार्गदर्शक अशोक रणदिवे, अशोक जोशी, भाजपा विस्तारक योगेंद्र अण्णा माने, मच्छिंद्र लकडे, शक्ती केंद्रप्रमुख ओमकार कदम, तेजस जेधे, विराज चव्हाण, अभिजित पवार, प्रशांत पाटोळे, युवराज चव्हाण, विपुल जगताप, ऋषी थोरात, सागर मोरे आदी उपस्थित होते. बूथ प्रमुख सुरेंद्र जेधे यांनी प्रास्ताविक व सुत्रचंलन केले तर आभार उमेश चव्हाण यांनी मानले.