पुरंदर मधील रावडेवाडी येथे एकाचा खून तर तीन जण जखमी
सासवड
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी येथे एकाचा खून करण्यात आला आहे. तर तीन जण गंभीर तजखमी झालेत .. रावडे वाडी येथे आज सायंकाळच्या सुमाराची घटना घडलीय ...या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलय....तर आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आलीत.. यामध्ये सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झालाय ..तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघेजण गंभीररित्या जखमी झालेत.. तर यामधील आरोपींची संख्या मोठी असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विविध ठिकाणी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत . आरोपीं पैकी काही लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे हत्येचं कारण अद्यापही कळून आले नसून यासंदर्भात पोलीस अधिकचा तपास करत आहेत..