५७ मुकमोर्चातून मराठ्यांचा संयम पाहिला, तो संयम तोडू नका : राजेश काकडे
मराठा समाजाला बदनाम करण्याचा सरकारचा डाव
नीरा दि.३
सरकार एका बाजूला मराठ्यांना महामंडळाच्या माध्यमातून मदत करत असल्याचे सांगते. मात्र दुसऱ्या बाजूला मराठ्यांना आरक्षण न देता आरक्षा न देण्याचा छुपा अजिंडा राबवते आहे. असा आरोप मराठा नेते व नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केला आहे. मराठ्यांनी 57 मोर्चे हे शांततेच्या मार्गाने काढले. याची दखल जगभरात घेतली गेली, मात्र याच मराठ्यांना संयम सोडण्यासाठी शासन भाग पाडत असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे.
नीरा (ता. पुरंदर) येथे आज मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी चौकामध्ये येऊन जालना जिल्ह्यात पोलिसांनी क्केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला . शांततेच्या मार्गाने हा निषेध करण्यात आला. मात्र यावेळी मराठा समाजातील तरुणांच्या मनामध्ये तीव्र संतापाच्या भावना दिसून आल्या. हा मोर्चा संपल्यानंतर पुरंदर तालुक्यातील मराठा समाजाचे नेते त्याचबरोबर निरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे यांनी पत्रकारांची संवाद साधताना तीव्र भावना बोलून दाखवल्या. आम्ही ५७ मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले. या मोर्चाची दखल जगाने घेतली. मराठा समाज कोणत्याही प्रकारे आगतिक होत नाही, किंवा एवढ्या तेवढ्या कारणाने आक्रमक होत नाही. मात्र सत्तेत आलेले सत्ताधीश आम्हाला जे दाखवतात,सांगतात अगदी त्या विरोधात छुपा अजेंडा चालवतात आणि म्हणूनच मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण मिळू शकले नाही. सत्तेत आलेल्या लोकांनी आता तरी जाग होणे गरजेचे आहे. या समाजाने जर संयम सोडला तर मग मात्र राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात शासनाला यश येणार नाही. कोणाच्यातरी आदेशावरूनच पोलिसांनी जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर हा माणूस लाठीमार केला. मराठा समाजाचे आंदोलन चिघळून देऊन मराठा समाजाला बदनाम करण्याचा हा एक प्रयत्न करण्यात आला आहे. अशा प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो असंही राजेश काकडे यांनी म्हटलं आहे
जर राज्यकर्त्यांच्या मनात आलं तर मराठा समाजाला आरक्षण देणे काही अवघड नाही. मात्र संयम पाळा म्हणत दहा वर्षाहून अधिक काळ मराठा समाजाला प्रतीक्षेत ठेवले आहे. संयम पाळायचा पण किती यालाही काहीतरी मर्यादा असते? आज मराठा समाजातील अनेक तरुण आणि युवती यांना त्यांच्याकडे बौद्धिक कौशल्य असून देखील शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत नाहीत . नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये बौद्धिक कौशल्य शारीरिक क्षमता असून नाकारल जात . मग अशा वेळेस मराठा समाजाने करायचं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे राज्या लोकांनी लोकांसाठी चालवलेल असेल तर लोकांचे हितासाठी काम करायला हवे मात्र हे सरकार प्रत्येक समाजाला आणि जातीला एकमेकांच्या विरोधात भांडायला लाऊन लावून आपलं इस्पित साध्य करत असल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यातील होत असलेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप काकडे यांनी केला.