काळानुसार रूढी आणि परंपरा बदलायला हव्यात : बौद्धाचार्य दादा गायकवाड
वडिलांच्या अस्थी शेतामध्ये विसर्जित करून दिला जलप्रदूषण टाळण्याचा संदेश
नीरा
आपल्या पूर्वजांनी काही रूढी आणि परंपरा सुरू केल्या, त्या आपण पाळत आलो मात्र काळानुरूप त्यामध्ये काही बदल होत असतात यापूर्वी सुद्धा त्या बदल केले गेले. अनेक वेळा असे बदल होत असतात आणि म्हणूनच आजही आपल्याला काही रुढीपरंपरा बदलणे गरजेचे आहे. ज्यामध्ये समाजहित आहे ते लक्षात घेऊन या रूढी परंपरा बदलल्या पाहिजेत असं आवाहन बौद्धाचार्य दादा गायकवाड यांनी केलं आहे.त्याची सुरवात स्वतः पासूनच करायला हवी असही त्यांनी म्हटलं आहे.
पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथील रहिवासी असलेले शाहू फुले आंबेडकर चळवळीचे पुरस्कर्ते विष्णू पोपट गायकवाड यांचं नुकतंच निधन झालं... यानंतर त्यांच्या सावडण्याचा कार्यक्रम पिसुर्टी येथे पारपडला मात्र त्यांच्या सावडण्याच्या कार्यक्रमानंतर अस्थी विसर्जन पाण्यात न करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. बौद्धाचार्य असलेल्या दादा गायकवाड यांनी याला पाठिंबा देत जलप्रदूषण टाळण्याचा आवाहन केलं. यानंतर त्यांच्या अस्थी गायकवाड यांच्या शेतात विसर्जित करण्यात आल्या आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं.
यानंतर माध्यमांशी बोलताना दादा गायकवाड म्हणाले की आपल्या रूढी आणि परंपरा या आपल्या गरजेनुसार सुरू झाल्या मधल्या काळात त्यामध्ये अनेक बदल झाले मात्र मागील काही काळापासून रूढी आणि परंपरा आहे तसे पाळल्या जातात त्या रुढींचा त्या परंपरांचा समाजाला किती उपयोग होतो याची चिकित्सा होणे गरजेचे असतं समाजाला उपयोगी असलेल्या रूढी परंपरा पाळल्या जाहिरात मात्र समाजामध्ये काही हानिकारक होत असेल तर मात्र अशा रूढी परंपरांना फाटा देणे अत्यंत आवश्यक आहे आज आम्ही जलप्रदूषण या समस्या कडे गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे ते रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे दररोज हजारो टन असती आणि राख आपण नदीमध्ये सोडतो त्यामुळे जलप्रदूषण वाढत असतात एका गावात सोडलेली ही असती आणि राग दुसऱ्या गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्यात जात असते त्यामुळे यापुढे लोकांनी नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये असतील तर विसर्जन न करता त्या आपल्याच शेतामध्ये कराव्यात यासाठी मी माझ्यापासून सुरुवात केली वडिलांच्या असती शेतामध्ये विसर्जित करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले हा वृक्ष आम्हाला आमच्या वडिलांची छाया देत राहील त्यांची आठवण या वृक्षाच्या रूपाने आम्हाला राहील त्यामुळे यापुढे सर्व बांधवांनी जलप्रदूषण टाळण्यासाठी असतील तर विसर्जन पाण्यात न करता शेतात करावा
यावेळी निरा आणि परिसरातील अनेक लोक त्याचबरोबर पिसोळी येथील लोक त्याचबरोबर गायकवाड यांचे नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते गायकवाड यांनी घेतलेल्या निर्णयाच्या सर्वांनीच कौतुक केलं त्याचबरोबर गायकवाड यांचा आदर्श घेऊन समाजातील लोकांनी अस्थि विसर्जनासाठी आपल्या शेतातच करावं असं आवाहन त्यांनी केलं गायकवाड यांचे नातू आर पी आयचे पुरंदर तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी देखील बुद्ध,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचाराची आज आपल्याला गरज असल्याचा म्हणत, प्रत्येक रूढी ,परंपरांचा अभ्यास करून त्या स्वीकाराव्यात किंवा कालबाह्य रूढी परंपरा बंद कराव्यात असं म्हणत गायकवाड यांच्या निर्णयाचे स्वागत केलं.