हरवले आहेत
राख येथून कर्नाटकी मजूर बेपत्ता..पुरंदर : राख (ता. पुरंदर) येथे पाइपलाइनच्या कामासाठी आलेल्या मजुरांपैकी एक ३६ वर्षीय मजूर बेपत्ता झाल्याची फिर्याद वाल्हे पोलीस चौकीत दाखल झाली आहे. या बाबत राख येथील मजुरी कामगार विलास पवार बेपत्ता झाल्याची माहिती मुकादम सागर राठोड यांनी आज निरा येथे माध्यमांना दिली.
दोन महिन्यांपूर्वी राख येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामासाठी काही मजूर कर्नाटक राज्यातून आले आहेत. मंगळवार दि. १९ रोजी सकाळी दहाच्या सुमारास विलास टाकू पवार वय ३६ वर्षे हे राहत्या ठिकाणाहून पत्नीला येतो थोडे फिरुन म्हणून बाहेर गेले. ते आज शनिवार दि.२३ रोजी पर्यंत परत आले नाहीत. याबाबत वाल्हा पोलीस दुरक्षेत्रात बुधवार दि. २० रोजी हरवल्याची फिर्याद देण्यात आली आहे. सोबत आलेल्या लोकांनी व नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली असता ते मिळून आले नाहीत.
नातेवाईकांनी आज निरा येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना विलास टाकू पवार मुळ रहिवासी टक्कळकी ता. निकोटा, जि. विजापूर हल्ली मुक्काम राख, ता. पुरंदर, जिल्हा पुणे हे गेली पाच दिवसांपासून हरवल्याची माहिती दिली. संबंधित व्यक्तीची उंची ५ फुट ५ इंच, रंग सावळा, दोन्ही भुवईंच्या मागे काळे डाग असुन अंगात भगव्या रंगाचा टीशर्ट आहे. हा व्यक्ती भोळसर स्वभावाचा असून कमी प्रमाणात समोरच्याशी बोलतात. अशा वर्णनाचा व्यक्ती आढळल्यास मुकादम सागर राठोड मोबाईल क्रमांक 9370416503 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.