सासवड येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
सासवड दि.१४
पुण्यातील सासवड येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय ...६५ ते ७० वयोगटातील हा व्यक्ती असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही..... कोणाच्या घरातील या वयोगटातील एखादी व्यक्ती हरवली असल्यास सासवड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन सासवड पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय..
आज गुरुवारी सकाळी सासवड पोलिसांना एका दुकानाच्या समोर हा मृतदेह आढळून आला.आंगत भगवा शर्ट,पांढरी पँट, परिधान केल्या आहेत तर त्याच्या जवळ दोन पिशव्या आढळून आल्या आहेत. तो वाटसरू किंवा वारकरी असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.