Type Here to Get Search Results !

हिंजवडी येथे मुलाचे अपहरण : सासवड पोलिसांनी केली सुटका : पहा नक्की काय आहे प्रकरण ?


आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैशांची चणचण...! हिंजवडीत थेट अल्पवयीन मुलाचे अपहरण...! ३० 



लाखांची मागितली खंडणी


सासवड पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद 







नीरा 
 : आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे कमी पडत होते म्हणून ताथवडे, हिंजवडी परिसरातून एका व्यावसायिकाच्या १४ वर्षाच्या मुलाचे शास्त्राचा धाक दाखवून तीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे समोर आले आहे. त्या अपहरण कर्त्याना सासवड पोलिसांच्या मदतीने हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अपहरण झालेल्या १४ वर्षीय मुलाची सासवड पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे सासवा पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे.

   या प्रकरणी सासवड पोलिसांनी तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २१ वर्षे, रा. दत्त मंदीर शेजारी, मारुंजी, पुणे मुळ रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे, अर्जुन सुरेश राठोड वय १९ वर्षे, रा. दत्त मंदीर शेजारी, मारुंजी पुणे, मुळ रा. लांबुरातांडा, ता. निलंगा, जि. लातूर, विलास संजय म्हस्के वय २२ वर्षे, रा. शिवारवस्ती, भुमकरचौक, पुणे मुळ पिंपळगाव, ता. जामखेड जि. अ.नगर यांना अटक केली असून त्यांना हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतून  शास्त्राचा धाक दाखवून खंडणीसाठी एका १४ वर्षीय बालकांचे निळ्या रंगाच्या मारुती झेन या गाडीतून अपहरण करण्यात आले. यानंतर मुलाच्या वडिलांकडे ३० लाखाचा खंडणीची मागणी करण्यात आली होती. यानंतर  हिंजवडी पोलिसांनी आरोपीने ज्या मोबाईलवरून फोन केला होता त्याचे.लोकेशन  तपासले असता आरोपीचा फोन सासवड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर   सासवड पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी  तीन पथके तयार करून सासवड शहरात येणारे रोडवर शोध मोहिम सुरु केली. त्यानंतर शोध घेत असताना  जुना कोडीत नाका ते सोपानकाका मंदीर रोडवर पोलिसांना सिध्दीविनायक अँटो गैरेज समार एक गडद निळ्या रंगाची मारुती झेन कार संशयीतरित्या समोरुन येताना दिसली. त्यावेळी पोलिसांनी  गाडी आडवून गाडीतील व्यक्तींना खाली उतरवून गाडीची झाडाझडती घेतली. त्यात लहान मुलगा असल्याचे निदर्शनास आले.  पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपींची झाडा झडती घेतली असता त्यांच्याकडे १ अग्निशस्त्र, १ लांब पात्याचा कोयता, १ सत्तूर १ कटावणी, तोंड लपविण्याचे तोंडाला लावलेले मास्क, एक लोखंडी हातोडी, ३ मोबाईल मिळून आले. अपहृत बालक, ३ आरोपी जप्त हत्यारासह सासवड पोलिसात आणण्यात आले. त्यातील एका आरोपींची आई आजारी असल्याने दवाखान्यात पैशांची गरज होती म्हणून  घरासमोरून त्याचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
     अपहरणा  अपहरण क्रत्यानी त्या मुलाच्या.वडिलांना फोन केला. मुलगा जिवंत हवा असेल तर तीस लाख रुपये घेऊन आम्ही सांगेल त्या ठिकाणी ये असे म्हणत खंडणी मागितली होती. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत ही कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी तेजस लोखंडे,अर्जुन राठोड,विलास म्हस्के यांना अटक केली आहे.यानंतर या आरोपींना हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
x

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies