जेजुरी जवळील भोरवाडी फाटा येथे एस.टी. बस आणि दुचाकीचा भीषण अपघात
अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
जेजुरी दिनांक २०
पुणे पंढरपूर महामार्गावरील जेजुरी नाजूक भोरवाडी फाटा येथे दुचाकी व एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे ..यामध्ये दुचाकी वरील दोन तरुणांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर झाला आहे.
पुण्याहून संगोळला निघालेली बस आणि वाल्हे हून जेजुरीला निघालेली मोटरसायकल यांची समोर समोर धडक झाली.दुचाकीवरील एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे. प्रशांत दाते अस या तरुणाच नाव असून तो वाल्हे नजीक सुखलवाडी येथील रहिवाशी आहे तर दुसरा तरुण वाल्हे येथील असून तुषार अस नाव असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.
घटनेनंतर वाल्हेकर ग्रामस्थ आक्रमक झाले असून लोकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.त्यामुळे पुणे पंढरपूर मार्ग काही काळ बंद ठेवावा लागला होता.जेजुरी पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र लोक आक्रमक झाले होते .चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोक करीत होते.अखेर माजी राज्य मंत्री विजय शिवतारे यांच्या मध्यस्थी नंतर ग्रामस्थ जेजुरी पोलीस स्तेशना मध्ये गेले असून जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृत देह जागेवरून हलवणार नसल्याचे लोकांनी म्हटले आहे.