नीरा येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुंबई गोवा मार्गाच्या कामासाठी करण्यात आले एसएमएस आंदोलन
नीरा दि. ९
पुरंदर तालुक्यातील निरा येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. पुणे जिल्हा पत्रकार संघ पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ व मराठी सोशल मीडिया परिषद यांच्या वतीने एसएमएस आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे यांना एसएमएस पाठवून मुंबई गोवा राज्य महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्गाचा दुरुस्ती साठी स आंदोलन आज राज्यभर सुरू आहे. या आंदोलनाला पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ आणि पुणे जिल्हा पत्रकार संघ त्याचबरोबर पुणे जिल्हा सोशल मीडिया संघाच्या वतीने सुद्धा पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सहप्रशिद्दीप्रमुख भरत निगडे,पुणे जिल्हा सोशल मीडिया परिषदेचे उपाध्यक्ष राहुल शिंदे,पुरंदर तालुका सोशल मीडिया सचिव स्वप्नील कांबळे,सुभाष जेधे,नाना लकडे,शौकत शेख,संध्या जगताप,सचिन मोरे इत्यादी उपस्थित होते.