एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यापेक्षा लाख मराठा एक होणं महत्वाचे आहे.: अभिजित जगताप
सासवड दि.९
सासवड येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वतंत्र्य लढ्यातील सैनिकांना अभिवादन करण्यात आले. तर मराठा क्रांती मोर्चाच्या आठवणींना ही यावेळी उजाळा देण्यात आला. याच दिवशी सासवड येथे धरणे आंदोलनाची सुरवात करण्यात आली होती.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे नऊ ऑगस्ट या क्रांती दिना निमित्त सासवड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर सहा वर्षांपूर्वी क्रांती दिनाचा औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या आठवणींना सुद्धा उजाळा देण्यात आला. मराठा समाजाच्यावतीने आत्ता पर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. मूक मोर्चा काढला. मात्र शासनाने याकडे फारसे लक्ष दिले नाही. एक मराठा लाख मराठा असं म्हणण्यापेक्षा लाख मराठा एक होण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पुरंदर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष अभिजीत जगताप यांनी म्हटलं आहे. सर्व मराठी जन एक झाले तर आपल्या मागण्यांचा विचार शासनाला करावाच लागेल. मात्र यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे अभिजीत जगताप यांनी म्हटले आहे.