चिमुरड्याचा आई प्रेमात पडली आणि स्वतःच्या मुलाची वैरीण ठरली
मावशीच्या तक्रारी नंतर जेजुरी पोलिसांनी लावला खुनाचा छडा
जेजुरी दि.२९
मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या चिमुरड्याचा गळा दाबून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, ४ वर्षाच्या मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील घाटात फेकून दिला होता. ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून दोघांना ताब्यात घेतल आहे.. खून झालेल्याचार वर्षीय मुलाचे नाव चुटक्या शंकर पवार असून त्याची आई रेणू शंकर पवार व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके या दोघांना जेजुरी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.याबाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल साबळे, सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे, दशरथ बनसोडे, प्रवीण शेंडे, पोलीस मित्र नानासाहेब घोगरे यांचा समावेश होता...या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर त्याचे प्रेत साडीत गुंडाळून व पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी गाडीवर घेवून येवून ते पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिले. याबाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्याच्या प्रेताचे अवशेष शोधून काढले आहेत. या दोघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे तपास करीत आहेत....