शासनआपल्यादारी कार्यक्रमासाठी आता मधपाची दिशा आणि जागा थोडी बदलली
आतातरी कार्यक्रम निर्विघ्न होणार का ?
जेजुरी दि ५
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे शासन आपल्यादारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र हा कार्यक्रम सलग चार वेळा पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर आता सोमवारी म्हणजे दिनांक सात ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम जेजुरी ते पुन्हा होणार आहे. मात्र हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमाचे ठिकाण मात्र बदलण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यात जेजुरी येथे शासन आपल्यादारी हा कार्यक्रम घेण्याचे राज्य सरकारने ठरवलं होतं. संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी हा कार्यक्रम होणार होता. अनेक लाभार्थींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ दिला जाणार होता. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जेजुरी येथील नवीन पालखीतळाची निवड केली होती. मोठी जागा असल्यामुळे या ठिकाणी दोन लाख लोक बसतील असा अंदाज करून या ठिकाणी मंडप टाकण्यात आला होता. स्टेज सजवण्यात आले होते. मात्र सलग चार वेळा या ठिकाणी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या ठिकाणचा मांडव ही काढण्यात आला आणि आता या कार्यक्रमाच ठिकाण बदलून येत्या सोमवारी हा कार्यक्रम जेजुरी मध्ये होत आहे. हा कार्यक्रम आता जेजुरी एमआयडीसी शेजारी असलेल्या जुन्या पालखीतळावर घेण्यात आला आहे कार्यक्रमाचे पालकत्व घेतलेले विजय शिवतरे यांनी या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा घेतला. मात्र यावेळी मंडळाची दिशा बदलण्यात आली आहे. व मंडपही 200 फूट पुढे द्रकवण्यात आला आहे.
मंडपाची जागा आणि दिशा बदलल्या बाबत अनेक तर्कवितर्क
पालखी तळावर होणार हा कार्यक्रम.सलग चार वेळा पुढे ढकलल्यामुळे सेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती.सतत कार्यक्रम पुढे ढकला जात असल्यामुळे कार्यक्रमाची जागा बदलण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी खाजगीत केली होती. त्यामुळे ही मंडपाचाची दिशा बदलून तो 200 फूट पुढे सरकवण्यात आला आहे. जागा व दिशा बदलण्याचा प्रयोग करण्यात आल्याची माहीत काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या आटीवर दिली आहे. आता जागा बदल्यावर किंवा त्यामध्ये थोडा बदल केल्यावर तरी हा कार्यक्रम होतो काय? किंवा हा कार्यक्रम होण्यासाठी गावच बदलावे लागते आहे हे पाहावे लागणार आहे.