८ वर्षांपूर्वी मंदीर चोरीतील फरार आरोपींच्या जेजुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या.
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील पिंगोर येथील ग्रामदेवतेचे मुकुट व दागिने असे ९६ हजारांच्या मालाची चोरी २०१५ साली झाली होती. ५ फेब्रुवारी रोजी रात्री ही चोरी झाल्याची फिर्याद विश्वास लक्ष्मण क्षीरसागर (वय ७० वर्षे) रा. पिंगोरी यांनी दिली होती. जेजुरी पोलीसांनी तब्बल आठ वर्षांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.
पिंगोरीची ग्रामदेवता असलेल्या वाघेश्वरी देवीच्या मंदिराच्या दरवाजा शेजारील लोखंडी ग्रीलची साखळी तोडुन आत प्रवेश करून मुकुट व दागिने असा ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज लबाडीचे इरादयाने चोरून नेवुन धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य केले होते. अशा मजकुरचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करणेत आला होता. या गुन्हा दाखल झालेपासुन गुन्हयातील आरोपीत हे फरार होते.
भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांचे मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पो.स.ई राहुल साबळे, सहा फौजदार सी.डी. झेंडे, पो. हवा. डी. एस. बनसोडे, पो.कॉ. प्रविण शेंडे यांनी दाखल गुन्हयातील फरार आरोपीतील जिवन मारूती उर्फ मिनसाहब राजपुत उर्फ नानावत (वय ६५ वर्षे) मुळ रा. नांदुर ता. दौड जि.पुणे सध्या रा. गोनावडी ता.खेड जि.पुणे व प्रमोद जिवन राजपुत उर्फ नानावत (वय ३२ वर्षे) रा. नांदुर ता. दौड जि. पुणे सध्या रा. गोनावडी ता.खेड जि. पुणे हे कोठे रहातात याबध्दल काही एक माहीती नसताना त्याचेबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहीती काढुन, वेळोवेळी पाठपुरावा करत त्यांना दि. ३० ऑगस्ट रोजी पहाटेचे सुमारास चाकण परीसरातुन ताब्यात घेवुन उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करणेत आल्याची माहिती जेजुरी पोलीसांनी दिली आहे.