सुकलवाडी परिसरातील बिबट्या जेरबंद
पुरंदर :
काल रविवारी दुपारी वाल्ह्याच्या सुकलवाडी येथे बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले होते. संध्याकाळी जेजुरी वन विभागाचे अधिकाऱ्यांनी सुकलवाडी येथे भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा केली होती. आज सोमवारी सकाळी या परिसरातून एक बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले असून, अजून एक बिबट्या या परिसरात असल्याची शंका वन विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
सुकलवाडी परिसरात वावरत असलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागला यश आले असुन सुकलवाडी परिसरात अजुन ऐका बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशी विनंती वन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. वनविभाग अधिकारी व त्यांच्या सर्व टिमचे सुकलवाडी ग्रामस्थांच्या वतीने मनःपुर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.