Type Here to Get Search Results !

पुरंदरच्या या गावात बिबट्याचे दर्शन. युवकांनी केले व्हिडिओ चित्रीकरण.

 पुरंदरच्या या गावात बिबट्याचे दर्शन.

युवकांनी केले व्हिडिओ चित्रीकरण.


पुरंदर :
     वाल्हे नजिकच्या सुकलवाडी गावच्या पुर्वेस आज बिबट्याचे दर्शन झाले. काही युवक शेतात कामानिमित्ताने दुचाकीवरुन जात असताना एका ऊसाच्या शेता शेजारील मोठ्या झाडाखाली सावलीला बिबट्या शांत बसल्याचा दिसला. शेतकऱ्यासह युवकांनी या बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले.

    पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील सुलकवाडी येथून कर्नलवाडीच्या झिरिपवस्ती येथे जाण्यासाठी रस्ता आहे. चिंचेचा मळा येथे रविवारी (दि.२७) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बोलाईमाता डोंगराच्या मागील बाजूच्या पायथ्याशी बिबट्या दिसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. यादरम्यान बिफट्याचा मुक्त वावर होता. युवकांच्या हालचाली वाढल्यावर बिबट्याने ऊसाच्या शेतात पळ काढला. विद्यार्थी राष्ट्रवादीचे पुरंदर तालुका अध्यक्ष संदेश पवार यांनी ही सर्व घटना मोबाईल चित्रीत केली.





       वन विभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, वनपरिमंडल अधिकारी राहुल रासकर, वनरक्षक पोपट कोळी, तसेच गोविंद निरडे यांनी घटनास्थळी रवाना झाले असून पुढील खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ते उपाययोजना केल्या जात आहेत. यावेळी वन अधिकाऱ्यांनी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी व सतर्क रहावे. तसेच पुन्हा बिबट्या दिसल्यास त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये असे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी सर्व नागरिकांना केले आहे. कर्नलवाडी, गुळूंचे, राख, दौंडज परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी सावधानता बाळगावी. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies