मराठी पत्रकार परिषदेचा परळीतील ज्येष्ठ पत्रकाराला मदतीचा हात
पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांची बहुमोल मदतपुणे :
परळी येथील जेष्ठ पत्रकार आनंत भातांगळे गुरुजी हे जेजुरीला सहकुटुंब दर्शनासाठी गेले होते. जेजुरी ते सासवड प्रवासादरम्यान त्यांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. यात त्यांचे पैसे व इतर उपयोगी वस्तूही चोरीस गेल्या. सदरील घटनेची माहिती भातांगळे गुरुजी यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या परळी येथील पदाधिकाऱ्यांना तात्काळ दिली.परळी येथील मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी यांनी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष शरद पाबळे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांना संबंधित घटनेची माहिती दिली. शरद पाबळे यांनी सुनील लोणकर यांना तातडीने मदत करण्याबाबत सूचना दिल्या.त्यानंतर सासवड येथे प्रत्यक्ष जाऊन सुनील लोणकर यांनी जेष्ठ पत्रकार अनंत भातांगळे गुरुजी यांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांना धीर दिला. जेवणाची व्यवस्था केली. सासवड ते परळी बसचे तिकिटाची व्यवस्था करून त्यांना परळीकडे रवाना केले. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषद नेहमीचं पत्रकारांच्या अडी अडचणीत सुख दुःखात धावून येत असते. अनेक पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेने मदतीचा हात दिला आहे.