चंद्रयानाच्या यशस्वी लँडिंग नंतर नीरेत जल्लोष
फटाकडे फोडून नागरिकांनी व्यक्त केला आनंद
नीरा दि.23
भारताचा चंद्रयान ३ आज चंद्रावर पोहचले चंद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर नीरेकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. नीरा येथील बुवासाहेब चौकामध्ये फटाके फोडून आणि 'भारत माता की जय' असा जयघोष करून नीरा येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक नागरिकांकडून करण्यात आलं.
आज साडेपाच वाजल्यापासून लोक आपल्या टीव्ही संचा समोर बसून होते. चंद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग कशाप्रकारे होतं हे पाहण्यासाठी सर्वच नागरिक दूरदर्शन संचाकडे अगदी डोळे लागून बसले होते. सव्वा सहा वाजल्याच्या दरम्यान या यांनाच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालं आणि भारताच्या सिरे पेचात मानाचा तुरा रोवला गेला. यानंतर सात वाजता नीरा येथील बुवासाहेब चौकामध्ये एकत्र येत फटाके फोडून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा येथील तरुणांनी 'भारत माता की जय, वंदे मातरम, इस्रोचा विजय असो' अशा प्रकारच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की, रशिया सारख्या देशाला जे जमलं नाही ते आज आपल्या देशाने करून दाखवलं. आपल्या देशाचा शास्त्रज्ञांनी एक मोठा टप्पा पार पडला आहे. चांद्रयान दोनच्या वेळी आपल्याला थोडंसं अपयश आलं, मात्र हे अपयश आता धुऊन निघाल आहे. आम्हा सर्वांना या शास्त्रज्ञांचा आणि त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. पहिलं चंद्रयान श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना चंद्रावर गेलं आणि यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या काळात तिसरी चंद्रयान मोहीम यशस्वी झाली. आपले राज्यकर्ते सुद्धा शास्त्रज्ञांना पाठबळ देतात हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनंता शिंदे, अभी भालेराव, माजी उपसरपंच विजय शिंदे,कुमार मोरे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे, सुदाम बंडगर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जगताप सुनील गवळी विजय धायगुडे, राजुभाई मनेर, सोनू बंडगर, राहुल चव्हाण , विराज शहा, अनिकेत शिंदे,गणेश फुलमाळी,रामदास लकडे,अल्ताफ सय्यद यांच्यासह अनेक तरुण उपस्थित होते.