सासवड येथील दि डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला लागली आग
दि डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची ही नवी शाखा
सासवड दि.२२
सासवड येथे अवघ्या पावणेदोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली दि डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची शाखा आगीत जळून भस्मसात झाली आहे .. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजलेच्या दरम्यान या बँकेच्या सासवड येथील नव्या शाखेला आग लागली. आग लागल्यानंतर सासवड पोलिसांनी सासवड नगरपरिषदेच्या अग्नी शमन यंत्रणेच्या साहाय्याने ही आज आटोक्यात आणली आहे. मात्र यामुळे बँकेतील सर्व साहित्य जळून गेलं आहे ....बँकेच्या नुकसानी बाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही मात्र. बँकेचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर आता या बँकेच्या फायर ऑडीटचा प्रश्न ही पुढे आला आहे.... कारण आवघ्या दोनच महिन्यांत ही आग लागली आहे.. त्यामुळे लोकांमधून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत...
याबाबत सासवड पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी अंदाजे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सासवड पोलीस स्टेशन येथे बँकेमध्ये आग लागल्याचा फोन आला व त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन बंब पाठवण्यात आला पाठवण्यात आला व आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सध्या आग आटोक्यात आलेली आहे. या आगी मागे नेमकं काय कारण आहे ? याबाबतीत सासवड पोलीस स्टेशन कडून कोणत्याही प्रकारची माहिती अजून दिलेली नाही. याबाबतीत तपास केला जाणार असल्याचे सांगितले आहे.या आगीत किती नुकसान झालेला आहे हे देखील अद्याप कळालेलं नाही. परंतु घटनास्थळी उपस्थित बँकेचे कर्मचारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिलेल्या माहिती देखील धक्कादायक आहे. बँकेची ही शाखा अवघ्या पावणेदोन महिन्या पूर्वी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या नवीन शाखेचे फायर ऑडिट झालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. एकंदरीतच अशा पद्धतीने बँकेची नवीन शाखा सुरू होत असताना ती शाखा सुरू होण्यापूर्वी त्या बिल्डिंगच स्ट्रक्चरल ऑडिट आणि बँकेचं फायर ऑडिट का केलं गेलं नाही? हा देखील मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे शिवाय नागरिकांमध्ये अशी देखील कुजबुज आहे. ही आग कृत्रिम की नैसर्गिक ? याबाबतीत आता शंकेला उधाण आलेले आहे .
बँक प्रशासनाने या आरोपांचा खंडन केलेलं असलं तरीदेखील नागरिकांमध्ये मात्र अशा पद्धतीची चर्चा आहे
अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बँकेच्या शाखेला अशा पद्धतीने आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झालं होतं