सासवड येथे मोटार सायकरल आणि छोटा हत्ती टेम्पो यांच्या धडकेत एकाचा मृत्यू
७० वर्षीय मोटरसायकल स्वराचा झाला जागेवरच मृत्यू
सासवड दि.२१
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये एक मोटरसायकल आणि छोटा हत्ती टेम्पो यांच्यामध्ये झालेल्या धडकेमध्ये एका ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.. शहाजी संताजी देशमुख अस त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.. घटने नंतर सासवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी वाहातुक सुरळीत केली आहे.
तर टेम्पो चालक स्वतःहून पोलिसात हजार झाला आहे.याबाबत मयत देशमुख यांचा मुलगा गिरीश शहाजी देशमुख यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे .
तर याबत प्रत्यक्ष दर्शी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार आज सोमवारी मयत शहाजी देशमुख हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच 12 aq 9350 व टेम्पो क्रमांक mh 12 hx 5936 यांच्यामध्ये अपघात झाला आणि त्यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला मार लागला .यामध्येच त्यांचा मृत्यू झाला .याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत.