सासवड येथे सेवानिवृत्त कर्नल एम. डी. कदम यांच्या हस्ते होणार पालखी तळावर ध्वजारोहण
सासवड दि.१४
सासवड येथील पालखी तळावर असणा-या ग्रामीण भागातील सर्वांत उंच ध्वजस्तंभावर दि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी निवृत्त कर्नल एम डी कदम यांच्या हस्ते आणि शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे अध्यक्षतेखाली ध्वजारोहण होणार आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशसेवा करणा-या जवानांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आणि सैन्यदल आणि पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा पुरंदर हवेली तालुक्यातील युवक युवतींचा सन्मान होणार असल्याची माहिती सासवड येथील राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष अनिल गद्रे यांनी दिली आहे.
सासवड येथील शिवस्मृती प्रतिष्ठान व सासवड नगरपालिकेच्या वतीने राष्ट्रध्वज समितीच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून येथील पालखी तळावर उभारण्यात आलेल्या उंच ध्वजस्तंभावर दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि १ मे महाराष्ट्र व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १ मे रोजी कामगार संघटनेच्या हस्ते ध्वजारोहण होते तर १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला सैन्यदलात सेवा बजावलेल्या सैन्यदलातील आजी माजी अधिकारी तसेच जवानांच्या तसेच वीरपत्नीच्या हस्ते धवजारोहण करण्यात येते. तसेच तालुक्यातील सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा मानपत्र देऊन सन्मान दरवर्षी करण्यात येतो.
यंदा स्वातंत्र्यदिनी सकाळी १०. ५ वाजता सैन्यदतील सेवानिवृत्त कर्नल एम डी कदम यांच्या हस्ते तसेच शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत, सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष अनिल गद्रे, सचिव रविंद्रपंत जगताप, सदस्य प्राचार्य ईस्माईल सय्यद, प्रा गजेंद्र अहिवळे, किरण पुरंदरे, हिरामण सहारे, नितीन भोंगळे, सुरज कराडे, सुजित बडदे, आणि शासकीय अधिकारी वर्ग, नागरीकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व जवानांच्या कुटुंबीयांचा तसेच पोलीस व सैन्यदलात नव्याने भरती झालेल्या युवकांचा सन्मान होणार आहे.