पत्रकार संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण
मुंबईतील अकरा संघटनांनी राज्यपालांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.
मुंबई :
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आज पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. एक बंदुकधारी पोलीस त्यांच्या रक्षणार्थ ठेवण्यात आला आहे. मुंबईतील अकरा संघटनांच्या प्रतिनिधींनी काल राज्यपालांची भेट घेऊन संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांना तसे निवेदन पाठविण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाचे एस. एम. देशमुख यांनी स्वागत केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्च शब्दात शिविगाळ करून दुसऱ्या दिवशी गुंडाकरवी मारहाण केली. याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटली. ठिकठिकाणी त्यांचा निषेध झाला. शुक्रवारी मुंबईतील प्रमुख अकरा पत्रकार संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. त्यानंतर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन किशोर पाटील यांच्यावर कारवाई करून पत्रकार संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.
मात्र, दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांचे दबावतंत्र सुरूच आहे. किशोर पाटील यांनी दोन चारशे कार्यकर्त्यांना आपल्या समर्थनार्थ मोर्चा काढायला लावला होता. यावेळी "किशोर पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है" च्या घोषणा दिल्या जात होत्या. सोशल मिडियावरून संदीप महाजन यांच्या बदनामीचीही जोरदार मोहीम आमदार समर्थकांकडू
न सुरू आहे.