पिंपरे येथे दोन दुचाकीची समोरा समोर धडक.
एक युवक ठार, तीन जखमी.
नीरा दि. ९ :-
वाहतुकीसाठी नेहमीच धोकादायक असलेल्या पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर रविवार (दि.०९) पुन्हा अपघात झाला.
निरा नजीक पिंपरे (ता.पुरंदर) येथे दोन दुचाकीस समोरासमोर धडकल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी आहेत. याबाबतची माहिती नीरा पोलिसांनी दिली आहे.
पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यानच्या निरा डावा कालव्यावरील पुलाजवळ दोन दुचाकी समोरा समोर धडकल्या. या अपघातात किरण रामदास धुमाळ (वय २८) रा. जेऊर, ता.पुरंदर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मावशी मिना कांतीलाल दरेकर (वय ४०) या जखमी झाल्या आहेत.
धुमाळ हे आपल्या एम. एच १२ जे. पी.३९३० या दुचाकीवरून निरा येथून जेऊरकडे निघाले होते. जेजुरी बाजूने मोहन विनायक रोंदळे (वय ३२) व भिमा बाळु मधुकर (वय ३०) रा. शिंदवणे ता.हवेली हे दोघे एम.एच. १२ ए.डी १४९४ दुचाकीवरून भरधाव आले. रोंदळे गाडी चावलत होते. त्यांनी विरुद्ध दिशेला येऊन धुमाळ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामध्ये चौघे ही जखमी झाले. किरण धुमाळ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. धुमाळे हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये नोकरीस होते. रविवारची सुट्टी असल्याने ते त्यांची मावशी मिना दरेकर सोबत ऊस लागणीसाठी जेऊरला निघाले होते. यावेळी हा अपघात झाला.
पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावरील, अरूंद महामार्ग असलेल्या दौंडज खिंड ते निरा हा मार्ग अत्यंत
धोकेदायक पालखी महामार्ग झाला आहे. या पालखी महामार्गावर अनेक छोटो- मोठे अपघात सुरू आहेत. मात्र, संबंधित प्रशासनाकडून जाणीवपुर्वक या अरूंद पालखी महामार्गाकडे काणाडोळा होत आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या आगोदर, या पालखी मार्गाची सार्वजनिक बांधकाम मंञी रवींद्र चव्हाण, महसूल मंञी राधाकृष्ण विखे - पाटील, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच आळंदी देवस्थान आदींनी पालखी तळ व पालखी महामार्गाची पाहणी केली होती.
माञ, यानंतरही या पालखी महामार्गावरील कोणत्याही कामाची दखल घेतली गेल्याचे दिसत नसून, वाल्हे ते निरा हा अत्यंत धोकेदायक अरूंद पालखी महामार्ग रुंदीकरण करण्यासंदर्भात अनेकदा मागणी करूनदेखील शासनाकडून माञ, याची अद्यापपर्यंत दखल घेतली जात नसल्याने, अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला असून, अनेकजन कायमचे जायबंदी झाले आहेत.
संबंधित विभागाने या घटनेकडे गांभीर्याने घेऊन, वाल्हे ते निरा हा अरूंद पालखी महामार्गाचे रुंदीकरण करून, साईडपट्टी भरून घ्यावी. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.