महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत युट्युबर संघटनेचे उपाध्यक्षपदी पत्रकार तुषार धुमाळ यांची निवड
पुणे दि.२७
महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत युट्युबर चॅनल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवड पुसेगाव येथील बैठकीत करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी प्रसिद्ध युट्यूबर सँडियन यादव यांची निवड करण्यात आली.तर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील प्रसिद्ध युट्युबर व पत्रकार तुषार धुमाळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आली आहे.
दि 25 श्री क्षेत्र पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांच्या मंदिर परिसरात युट्युबरच्या अडीअडचणी व संघटन करण्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक पारपडली . या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्यातील बैलगाडी शर्यत यूट्यूब च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सर्व युट्युबर उपस्थित होते.बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रथमच लाईव्ह व मुलाखत घेणाऱ्या युट्युबरची संघटना स्थापन झाली असून आगामी काळामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्राचा प्रचार व प्रसार करणे तसेच गोवंश संवर्धनासाठी आम्ही एकत्र येत निर्णय घेतले असल्याचे निर्वाचित उपाध्यक्ष तुषार धुमाळ यांनी सांगितले आहे. धुमाळ यांनी मैदान रिपोर्टर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत घराघरापर्यंत पोचवली.