हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर बिनविरोध निवड
उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरेआळंदी प्रतिनिधी :
मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण आळंदी (ता. खेड ) संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर, उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजय इंगुळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केली. यावेळी झालेल्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे स्वागत करण्यात आले. पत्रकार संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशा नुसार मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषद राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पुणे विभागीय सचिव अरुण नाना कांबळे, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, राज्य सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांच्या मार्गदर्शना नुसार तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांचे सूचने प्रमाणे पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण आळंदीची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती.
नवनिर्वाचित पदाधिकारी यामध्ये अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर, उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे, कोषाध्यक्ष सुनील बटवाल, सचिव गौतम पाटोळे, कायेदशीर सल्लगार ऍड. विलास काटे, कार्यकारिणी सदस्यपदी भागवत काटकर, अनिल जोगदंड, बद्रीनारायण घुगे, अनिराज मेदनकर, प्रसन्नकुमार देवकर, हनुमंत घोंगडे यांची निवड करण्यात आली. पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या निमंत्रकपदी अविनाश राळे, जिल्हा प्रतिनिधी हनुमंत देवकर, श्रीकांत बोरावके, सल्लगार हरिदास कड यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संजय इंगुळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी काम पाहिले. निर्धारित मुदतीत आणि प्रत्येक जागेसाठी एक एक अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. पसायदानाने निवडणूक सभेची सांगता उत्साहात झाली.