बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, उपाध्यक्ष संभाजी काकडे तर सचिव संदिप आढाव बिनविरोध निवड.
पुणे :
मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित बारामती तालूका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेमंत गडकरी, उपाध्यक्षपदी संभाजी काकडे, तर सचिवपदी संदिप आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल शिंदे व सह निवडणूक निर्णय अधिकारी भरत निगडे यांनी निवड जाहीर केली.
मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ व पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या सुचनेनुसार बारामती तालुका मराठी पत्रकार परिषदेची द्ववार्षीक निवडणूक प्रक्रिया मोरगाव येथील शिवांकूश मंगल कार्यालयात पार पडली. सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. अध्यक्षपदासाठी हेमंत गडकरी, उपाध्यक्ष पदासाठी संभाजी काकडे, सचिव पदासाठी संदिप आढाव, कार्याध्यक्ष पदासाठी सचिन पवार खजिनदार पदासाठी बाळासाहेब बालगुडे , कार्यकारण सदस्य पदासाठी आसिफ शेख, अमोल गायकवाड यांची नियोजित वेळेत प्रत्येकी एक अर्ज आल्याने सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या निमंत्रक पदी राजेश वाघ, जिल्हा प्रतिनिधी म्हणून चिंतामणी क्षिरसागर, वसंत मोरे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी अशोक वेदपाठक, योगेश भोसले, मनोहर तावरे, प्रशांत धुमाळ, विजय भोसले, सतिश गावडे, ॲड. अमर वाघ, प्रशांत धुमाळ, सुनील जाधव, संतोष चौधरी आदी बारामती तालुक्यातील पत्रकार सदस्य उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार, मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषद राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पुणे विभागीय सचिव अरुणनाना कांबळे, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या आवाहनानुसार बारामती तालुका पत्रकार संघाची निवडणूक जाहीर झाली होती. त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.