जेजुरी नजीक एसटी आणि पिकअप टेम्पोचा अपघात
वारकरी जखमी
जेजुरी दि.१०
पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर मार्गावर जेजुरी नजीक भोरवाडीफाटा येथे एसटी बस आणि पिकप टेम्पो यांचा भीषण अपघात झालाय. पंढरपूरहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि पुणे बाजूकडून वाल्हेकडे निघालेल्या पिकअप टेम्पो यांची समोरा समोर जोरदार धडक झाली..
यामध्ये एसटीतील 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. यातील एका प्रवाशांच्या पायाचे हाड मोडले असून एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे... अपघातानंतर जेजुरी पोलीस आणि स्थानिकांनी मदत करून जखमींना बाहेर काढलय.. याठिकाणी अरुंद रस्ता असल्याने दोन्ही वाहने समोरा समोर एकमेकांना धडकलीत... यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून. 15 ते 16 लोक जखमी झाले आहेत.