पांगारे येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
सासवड दि.३
पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असून यासंदर्भात सासवड पोलीससात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील किरण सिताराम शेलार यांनी यासंदर्भातील फिर्याद सासवड पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत संतोष संपत शेलार वय ४८ वर्षे राहणार पांगारे शेलारवस्ती हे जून रोजी दुपारी १ वा. चे सुमारास बालदरा डोंगराकडे गेला असून ताे अजुन आला नाही. अशी माहिती त्यांना त्यांच्या भावकितील हरीष महादेव शेलार यांनी दिली होती.रात्रीही ते घरी आले नाहीत.त्यामुळे दिनांक ३/६/२०२३ रोजी पहाटे त्याचा बासदरा डोंंंगराकडेे शोध घेतला आसता पांगारे गावचे हाद्दीत बालदरा डोंगरात जमीन गट नं. ९१८ मध्ये मयत स्थीतीत मिळुन आले आहे. त्याचे तोंडाचा वास येत होता. अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.पोलिसांनी मृत देह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मयत संतोष शेलार हे कर्जबाजारी होते.त्यांनी सोयापनीर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता.मात्र त्यांना त्यात यश आले नाही.त्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते.यातून च त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांकडून बोललं जात आहे. दरम्यान मयत संतोष शेलार हे माजी मंत्री व शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांचे भाचे म्हणजेच बहिणीचा मुलगा होता.त्यांच्या अशा प्रकारच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.