बाजार समितीचा संचालक मंडळात तज्ञ संचालकांची नियुक्ती करा : शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांची मागणी
नीरा दि.२४
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये तज्ञ संचालक नियुक्त करण्याची किंवा स्वीकृत संचालक घेण्याची पद्धत यापूर्वी होती. ती पद्धत पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे यांनी केली आहे. याबाबतची मागणी करणार पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सहकार विभाग आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याकडे दिले आहे.
सहकारी क्षेत्रातील बहुतांश संस्थांमध्ये तज्ञ संचालक नियुक्त करण्याची पद्धत पूर्वीपासून सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा अशा प्रकारची तरतूद होती. मात्र २०१६ मध्ये या तरतुदीमध्ये राज्य सरकारकडून बदल करण्यात आला आणि तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर तज्ञ संचालक नियुक्ती करणे बंद झाले. ही पद्धत पुन्हा सुरू करावी आणि तज्ञ संचालक किंवा तज्ञ शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी संबंधित विभागांना दिला आहे.
राज्यभरात नुकतीच बाजार समितीची निवडणूक प्रक्रियापार पडली आहे.अनेक बाजार समितीवर सभापती,उपसभापती यांची सुद्धा निवड झाली आहे. मात्र बाजार समितीवर सध्या असणारे संचालक हे सर्व सामान्य कुटुंबातील आहेत.त्यांना सर्वच बाबींचे ज्ञान असेल असे नाही.त्यामुळे सहकारातील सर्वच संस्थांमध्ये ज्या पद्धतीने तज्ञ संचालकांची नियुक्ती केली जाते त्याच नैसर्गिक न्यायाने बाजार समितीत सुद्धा तज्ञ संचाकलकाची नियुक्ती व्हायला हवी आहे. साखर कारखाना ,जिल्हा बँक, सोसायटी याठिकाणी तज्ञ संचालक नेमण्यात येतो. किंवा नियुक्ती करण्यात येते. तज्ञ व्यक्ती किंवा एखादा प्रगतिशील शेतकरी.
बाजार समितीत असल्यास शेतकऱ्यांना आणि बाजार समितीला त्याचा फायदा होईल.अनेक वेळा तज्ञ लोक निवडणुकी मध्ये होणार खर्च व जाणारा वेळ यामुळे निवडणुकीत सहभागी होत नाहीत.मात्र अशा लोकांना सहकारी सांस्थेत संचालक म्हणून घेणे फायद्याचे आहे असे गिरमे यांनी म्हटले आहे.