Type Here to Get Search Results !

नांदगाव येथील भावंडांनी बनवले आईचे स्मारक

 नांदगाव येथील भावंडांनी  बनवले आईचे स्मारक 



 भोर  दि.१०


     पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नांद गावातील दोघा भावांनी, आईच्या स्मरणार्थ घरासमोर आईच स्मारक उभारलय.दिवंगत आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा बनवून, घरासमोच्या अंगणात त्याची स्थापना केलीय. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक असलेल्या सुनील गोळे आणि मेकॅनिक असलेल्या संतोष गोळे या दोघा भावांनी समाजा समोर आदर्श ठेवलाय.परिसरातल्या नागरिकांनी गोळे कुटुंबाच्या या कृतीचं कौतुक केलंय.


भोर तालुक्यातील नांद गावाचे रहिवासी, शिक्षक असलेले सुनील दत्तात्रय गोळे आणि संतोष दत्तात्रय गोळे(मेकॅनिक) यांच्या घरकाम आणि शेती करणाऱ्या मातोश्री कै. राहीबाई गोळे (वय ६२) यांचे वर्षापुर्वी करोना मुळे बाणेर (पुणे) येथे निधन झाले. निधना नंतर वर्षश्राद्ध सारेच घालतात. परंतू आई विषयी असणारे प्रेम,श्रद्धा,भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरा समोरच मंदिर उभारून त्यात आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कुटुंबाने आईचे स्मारक उभारुन एक नवा आदर्श त्यांनी समाजा समोर निर्माण केला आहे. 

कै. राहीबाई यांनी शेती आणि सामाजिक कार्याची आवड असनाऱ्या पती दत्तात्रय गोळे यांचे सोबत ४५ वर्ष सुखात संसार केला. दोन मुले आणि दोन मुलींना चांगले शिक्षण देऊन संस्कार दिले. कै.राहीबाई या कुटुंबावरच प्रेम करुन थांबल्यानाहीत तर आपले नातेवाईक आणि गावासाठी असनारे प्रेम आपुलकी आजही ग्रामस्थ आणि सगे सोयरे बोलून दाखवत आहेत.


आईच्या निधनानंतर घरी आई नसल्याचं दुःख सहन होत नव्हते मनात आईची आठवण सतत येत होती. त्यावेळी राहीबाई यांचे पती दत्तात्रय गोळे तसेच सुनिल, संतोष ही दोन मुले, निलीमा खंडाळे,प्रमिला पाडळे या दोन मुली आणि संतोष पाडळे (जावई) यांनी विचार विनीमय करुन स्मारक बांधण्याचे ठरवले आणि ते दि.८ एप्रिल रोजी पुतळा अनावरण सोहळ्याने सत्यात उतरले आहे. यावेळी होम हवन,महाप्रसाद, हभप नेहाताई साळेकर यांचे किर्तन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठल आवाळे यांचे हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. यावेळी बीडी गायकवाड,सरपंच प्रिती गोळे,नातेवाईक,नांद गावातले आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies