Type Here to Get Search Results !

आल्याच्या शेतीतून शेतकरी झाला लखपती

 पाऊने दोन एकरात घेतले  २७  टन आल्याचे उत्पादन

 सेवानिवृत्ती नंतर संभाजी काकडे यांची शेती मध्ये भरारी 



  नीरा दि.९


       नीरा नजीक असलेल्या निंबुत येथील शेतकरी संभाजीराव काकडे Sambhajirao Kakade यांनी आपल्या शेतात आल्याचे  यशस्वी उत्पादन घेतले आहे. पहिलं वर्ष तोट्यात गेले असले तरी यावर्षी त्यांना आल्याला चांगला बाजार मिळाला आहे.यावेळी त्यांन प्रतिटन 66  हजाराचा भाव मिळाला आहे.त्यामुळे आल्या पासून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे.


   नींबुत येथील संभाजीराव काकडे हे सोमेश्वर विद्यालयात नोकरीला होते. 2021 मध्ये नोकरीतून निवृत्त झाले . यानंतर त्यांनी आपल्या शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला सुरवात केली. आपल्या शेता पैकी पावणे दोन एकर शेतात त्यांनी आल्याची लागवड केली.विशेष म्हणजे पपईच्या बागेत अंतर पीक म्हणून त्यांनी हे आल्याचे पीक घेतले आहे. पहिल्या वर्षी त्यांना टनाला केवळ 10 हजाराचा भाव मिळाला.त्यामुळे पाहिलं वर्ष त्यांना तोट्यात गेले. मात्र तरी देखील त्यांनी हार न मानता पुन्हा पावने दोन एकर क्षेत्रात आल्याची पुन्हा लागवड केली. या वर्षी मात्र त्यांना आल्याने आणि त्याला मिळणाऱ्या बाजार भावाने चांगली साथ दिली. यावर्षी त्यांना जागेवरच ६६  हजार प्रतिटन भाव मिळाला आहे. त्यामुळे त्यांना यावर्षी आल्याच्या शेतातून फायदा झाला आहे 

           आले हे पीक तस सातारा, कोरेगाव ,सांगली या भागात घेतले जाते.पुणे जिल्ह्यात पुरंदर, बारामती तालुक्यात आल्याचे पीक फारसे घेतले जात नाही.परंतु काकडे यांनी प्रयोग म्हणून हे पीक घेतले. त्यांना एकूण 6 लक्ष 12 हजार  रुपयाचे खर्च आला.त्यांना पावणे दोन एकरात 27 टन उत्पादन मिळाले.म्हणजे त्यांना 17 लक्ष  82 हजाराचे उत्पादन मिळाले.यातून खर्च वजा केले तर ११ लक्ष ६५ हजाराचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. त्यामुळे उसाच्या मागे धावण्या पेक्षा आल्याचे उत्पादन घेण्यात त्यांना यश आले आहे.




  संभाजी काकडे ( शेतकरी )


          " यावर्षी मला आल्याचे चांगले उत्पादन मिळाले मात्र मागील वर्षी एकरी तीन लक्ष रुपये तोटा झाला होता. मागील तोट्याने खचून न जाता पीक सातत्य ठेवल्यास फायदा  झाला.आपल्या  मातीत हे पीक व्यवस्थित येईल का नाही ? या बाबत शंका होती. मात्र यावेळी चांगले पीक आले. त्याच बरोबर बाजारही चांगला मिळाला.यातून मागील तोटाही भरून काढता आला.

     शेत मालाला सरकारने जर हमी भाव दिला तर अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे लक्ष देतील आणि रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल "



 


सेंद्रिय पद्धतीचा जास्तीत जास्त  वापर 


 काकडे यांनी साताऱ्यातील कोरेगाव मधून स्थानिक बियाणे आणून त्याची लागवड केली. सुरवातीला शेणखत.बांधणीच्या वेळी कोंबड खत याचा भरपूर वापर केला. सेंद्रिय खतांचा जास्त वापर केला. ड्रिपच्या माध्यमातून रासायनिक खतांचा वापरही केला. मात्र रासायनिक खतांचा वापर त्यांनी केवळ 10 टक्केच  केला. पाठीमागील वर्षी रासायनिक खतांचा वापर 30 टक्के होता. आता पुढील पीक हे 100  सेंद्रिय पद्धतीने घेणार असल्याचे काकडे म्हणाले 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies