महाविकास आघाडीकडून शिवसेनेची गोची: एका जागेसाठी ठेवलंय ताटकळत. आघाडीवर प्रश्न चिन्ह
सासवड दि.२०
पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आघाडीमध्ये अजूनही एकमत होत नसल्याने उद्धव ठाकरे शिवसेना आघाडीतून बाहेर पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुरंदर तालुक्यातील पाच आणि बारामती तालुक्यातून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला आठ जागा आल्या आहेत. यातून एक जागा उद्धव ठाकरे शिवसेनेसाठी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एक तास उरला असताना देखील याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या असून उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने स्वतंत्र लढण्याचा विचार व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये होते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने सकाळीच दहा उमेदवार जाहीर केले तर काँग्रेसचे अजूनही उमेदवार जाहीर झाले नाहीत. त्यामुळे या तासाभरात काय घडतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.