आज होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट
बाजार समितीतील अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
नीरा दि.२०
पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 142 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज माघारी घेणार नसल्याचं भाजपच्यावतीने सांगण्यात येतं आहे . तर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी, शेतकरी संघटनेनं ही सहभाग घेतला आहे.त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढली आहे. मात्र विजयी मतदान आघाडीच्या बाजूला आहे.त्यामुळे इतर पक्ष ऐनवेळी माघारी घेतात की, निवडणुकीला सामोरे जातात हे पाहावे लागेल.दुपारी तीन नंतर याबाबतचं चित्र स्पष्ट होईल .
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मागील काळात बिनविरोध किंवा काही अंशी बिन विरोध करण्यात आल्या होत्या.काही अंशी म्हणजेच एक दोन जागांवर मतदान द्यावे लागले होते. तर बहुतांश जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली होती.त्यावेळी बाजार समिती तोट्यात असल्याने व बाजार समितीकडे उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसल्याने कोणताही पक्ष हा पांढरा हत्ती आपल्या ताब्यात घेऊ इच्छित नव्हता.मात्र आता ही बाजार समिती तोट्यातून बाहेर काढन्यात मागील संचालकांना यश आल आहे.त्याच बरोबर समितीचा एक पेट्रोल पंप निरा येथे सुरू असून आणखी एका पेट्रोल पंपला मंजुरी मिळाली आहे. बाजार समितीची सर्व देणी नील झाली आहेत. त्यामुळे आता अनेक जण या बाजार समितीवर जाण्यास उत्सुक आहेत.सध्या 18 जागांसाठी 142 उमेदवार रिंगणात आहेत.