Type Here to Get Search Results !

विजय शिवतारे यांची साखर पेरणी नक्की कशासाठी

 विजय शिवतारे यांची साखर पेरणी नक्की कशासाठी 

आगामी विधानसभा निवणुळीत पराभव टाळण्याचे प्रयत्न ? 



  नीरा दि.१६ ( राहुल शिंदे)


      गेली १३ वर्ष पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे बारामतीच्या पवार कुटुंबियांच्या नावाने खडे फोडत आले आहेत. शिवतारे यांच्या राजकारणाचा पायाच मुळात पवार विरोध आणि पवारांवरील टीका हा राहिला आहे. मात्र हेच विजय शिवतारे सध्या बारामतीचे छोटे पवार राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना गोंजराताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अजित पवारांसमोर साखर पेरणी करताना दिसून आले आहेत.

       पुरंदर तालुक्यामध्ये राजकारणाला सुरुवात केल्यानंतर पुरंदरचे माजी आमदार, राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवारांना विरोध आणि पवारांवर जहरी टीका हे राजकारणाचे सूत्र अवलंबले .पवारांनी पुरंदरचा विकास केला नाही असं म्हणत त्यांनी नेहमीच पुरंदरची तुलना बारामतीसी केली. बारामतीतील रस्ते, बारामतीतील शिक्षण संस्था, बारामतीत झालेली बागायत शेती, बारामती मध्ये असलेल्या वैद्यकीय सुविधा याची तुलना विजय शिवतरे हे नेहमीच करत राहिले. दहा वर्ष सत्त्तेत राहिल्यानंतर बारामतीच्या अजित पवारांनी विजय शिवतरे यांना कात्रजचा घाट दाखवला. लोकसभा निवडणुकीमध्ये विजय शिवतरे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली. शरद पवारांना तर "बहलोल खानाची" उपमा दिली आणि याचाच राग मनात धरून बारामतीतील अजित पवार यांनी विजय शिवतरे यांना "आता कसा आमदार होतो तेच पाहतो!" असे म्हणत चारी मुंड्या चीत केले. राज्यमंत्री राहिलेल्या विजय शिवतरे यांचा पराभव अजित पवार यांनी सहज केला. त्यामुळे मागील अडीच वर्षात विजय शिवतरे यांना सक्रिय राजकारणापासून दूर राहावे लागले. मात्र भाजप आणि शिंदेचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार कुटुंबियांना टक्कर देण्याचा विडा उचलला. आता ते सतत बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, दौंड, इंदापूर या भागाचे दौरे करीत असतात. या भागात जाऊन शिवसेना( की भाजप?) कशी वाढेल यासाठी ते प्रयत्नशील असतात. मात्र हे करत असताना पुरंदर मध्ये वापरलेला फॉर्मुलाच ते पुन्हा इतर तालुक्यात वापरताना दिसून येतात. शिवतरे यांचा पुरंदर मध्ये हा फॉर्मुला सध्या फ्लॉप ठरत असला, तरी बारामती दौंड, इंदापूर आणि भोर तालुक्यातील लोकांना शिवतारे यांच्या बद्दल आकर्षण आहे. शिवतरे यांची बोलण्याची पद्धत आणि बेधडक भिडण्याची सवय यामुळे पवार विरोधक शिवतरेयांच्या भोवती एकवटताना दिसतात.

          मात्र काल इंदापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बारामतीतील छोटे पवार अर्थात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळलित. अजित पवार चांगले काम करणारा नेता असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर अजित पवार चुकीच्या पक्षात असल्याचेही त्यांनी म्हटले. अजित पवारांनी शिंदे सेने मध्ये यावं असं एक प्रकारच आवाहन त्यांनी अजित पवारांना केले. मात्र अजित पवारांना शिवतारे यांनी हे केलेला आवाहन म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केलेली साखर पेरणीस आहे .असा अंदाज पुरंदर मधील नागरिक व्यक्त करत आहेत


          शिवतारे यांच्या विजयाला होता राष्ट्रवादीचाच टेकू 

 

       विजय शिवतरे हे मुंबहीहून पुरंदर मध्ये आले. त्यांनी पवार कुटुंबीयांच्या विरोधात जोरदार टीका टिप्पणी सुरू केली आणि पुरंदर मधील पवार विरुद्ध गट हा विजय शिवतरे यांच्या बाजूला गेला. दादा जाधवराव यांच्या नंतर पुरंदर मध्ये असलेली राजकीय पोकळी त्यांनी भरून काढली. मात्र त्यांच्या विजयाला आवश्यक असलेले विजयी मतदान हे त्यांना सुरुवातीला राष्ट्रवादीकडूनच मिळालं तर दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा विजय आपलाच आहे. असं म्हणत शरद पवार यांनी विजय शिवतरे यांच्या विजयाचा मार्ग सुखकर केला आणि संजय जगताप यांना पराभव स्वीकारावा लागला व्यासपीठावर शरद पवारांचा विरोध जरी शिवतरे करीत असले तरी ते आतून शरद पवारांचा हात धरून होते. राष्ट्रवादीतील अनेक नेते आजही विजय शिवतरे यांच्याशी संपर्क ठेऊन आहेत. मात्र लोकसभेच्या निवडणूक काळात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीचा रोष त्यांना उडवून घ्यावा लागला आणि पराभवाचा सामना करावा लागला. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा पराभवाची वेळ येऊ नये म्हणून विजय शिवतरे यांनी आत्तापासूनच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे नेते यांचा विरोध कमी करता यावा म्हणून थेट त्यांच्या नेत्यातच तोंड भरून कौतुक केले आहे.

  

  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies