जुन जनता दल चालवतय राष्ट्रवादी काँगेस पक्ष : भाजप प्रवेश नंतर भानुकाका जगताप यांची राष्ट्रवादीवर टीका
सासवड दि.१४
तालुक्यातील पुढाऱ्यांची लाथाळी आमच्यावर अन्याय करतायत अस म्हणत नुकतेच भाजपमध्ये गेलेले भानुकाका जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर सडकून टीका केली आहे.सासवड येथे ते आज माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भानुकाक जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश केला आहे. बाजार समितीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाला असल्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.त्यांच्या या प्रवेशाने बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला फारसा फरक पडणार नसला तरी राष्ट्रवादीत फुटीचे आणि बंडाचे बीज त्यांनीं पेरले आहे.आणि भाजपला तालुक्यात हातपाय पसरायला संधी मिळाली आहे.त्यांच्या सोबत आमदार संजय जगताप यांचे कट्टर आणि मागील निवडणुकीत ज्यांनी संजय जगताप यांची बाजू नेटाने मंडळी ते प्रदीप जगताप ही भाजप मध्ये गेले आहेत.त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.यामुळे आ.संजय जगताप यांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होत आहे.
आज शुक्रवारी भाणुकाका जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जुना जनता दल चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.असाच आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अशोक टेकवडे यांनी सुद्धा पत्राद्वारे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गरटकर यांच्याकडे केला आहे. तर राष्ट्रवादीतील नेते एकमेकांची उनी धूनी काढत आहेत.त्यांच्यात एकमत मानी स्वतः त्याच्यमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.प्रत्येक ज्येष्ठ नेता त्याच्या मुलाची,मुलीची , सुनेची वर्णी चांगल्या ठिकाणी कशी लागेल यासाठी प्रयत्नशिल आहे.त्यांना जनतेच किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याचे काही घेण देण नाही असं त्यांनी म्हटलय. सासवड नगर परिषदेत युती केली पण आम्हाला कोणतीही ताकत दिली नाही असाही त्यांनीं म्हटलंय. आमच्या दोन पिढ्या आम्ही शरद पवार यांची सेवा केली पण पक्ष श्रेष्ठी याकडे लक्ष देत नाहीत.चुकीच्या लोकांना पडे दिली आणि त्यामुळे पक्षाच आणि जनतेच नुकसान झाले आहे.