नीरा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
नीरा दि.१४
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शुक्रवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायात कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रतिमा पुजना नंतर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनात बुद्ध वंदना घेण्यात आली...
नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वच महापुरुषांच्या जयंती नियमित पनेसाजऱ्या केल्या जातात. आज शुक्रवारी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध राजकीय पक्ष वा संघटना यांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नीरा येथे सर्वच लोक एकत्र येवून जयंती उत्सव साजरा करीत असतात.हे सामाजिक एकतेच प्रतीक असल्याचे यावेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी म्हटलंय...तर सरपंच तेजश्री काकडे यांनी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संर्वकश सविधनामुळेच आज माझ्यासारखी महिला देखील गावची सरपंच होऊ शकले असे म्हटलंय तर नीरा येथे लवकरच नीरा येथे संविधान स्थंभ उभारला जाईल असं त्यांनी म्हटलंय.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,
, सदस्य वैशाली काळे, अभि भालेराव , संदीप धायगुडे, अड. आदेश गिरमे गौतम भालेराव, माजी उपसरपंच कल्याण जेधे, दीपक काकडे, कुमार मोरे विजय शिंदे, उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख सुदाम बंडगर, आर पी आयचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे, अमोल साबळे, दादा गायकवाड, बाळासाहेब ननवरे हरिभाऊ जेधे, इत्यादी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.
तर वार्ड क्रमांक चार मध्ये नितीन केदारी ,आणि माजी उपसरपंच कुमार मोरे यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली त्याच बरोबर सर्वोदय सोसायटी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली .यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.