पुरंदरच्या वारकरी दांपत्याला विठ्ठलाच्या चंदनऊटी पुजेचा मान.
नीरा दि. 13
श्री क्षेत्र पंढरपुर येथे चैत्र व वैशाख महिण्यात श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची चंदनऊटी पुजा केली जाते. वाढत्या ऊन्हाच्या उष्णतेने देवाच्या शरीराचा दाह होऊ नये यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेस चंदनऊटीचा लेप लावण्याची परंपरा आहे. कांबळवाडी (ता. पुरंदर) येथील श्री. अरविंद काळभोर आणि सौ. रंजना काळभोर या वारकरी दांपत्याला पंढरपुर येथे चंदनऊटी पुजेचा मान मिळाला. श्री विठ्ठल-रूक्मिणी देवस्थान समिती, पंढरपुर यांच्या वतीने ही पुजा घेतली जाते. श्री विठ्ठलाला आणि रूक्मिणी मातेला प्रत्येकी दिड किलोचा चंदनाचा लेप लावला जातो. नविन वस्त्रे परीधान करून गोड नैवेद्य दाखवून आरती केली जाते. जवळपास दीड तास ही पुजा चालते.
अरविंद काळभोर हे शेतकरी असून गेली वीस वर्षे नियमीतपणे आषाढी वारी करतात. श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील रुद्रगंगा परींचे परीसर भागवत प्रसारक दिंडीचे ते विश्वस्त म्हणुन काम पाहतात. रंजना काळभोर या गृहिणी असुन नियमीतपणे वारी करतात. काळभोर दांपत्याने चंदनऊटी पुजेचा मान मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी ह.भ.प. निखील महाराज घाडगे, ह.भ.प. कांतीलाल काळभोर, हिराबाई काळभोर, शालन जाधव, विजया कदम, विक्रम घाडगे, सुप्रिया घाडगे, स्वयम घाडगे हे नातेवाईक पुजेमध्ये सहभागी झाले होते.