एक एकर स्वीटकॉर्नच्या उत्पादनातून तीन महिन्यात घेतले लाखाचे उत्पन्न
कमी पाण्यावर उत्पादन घेत तरुणाची दमदार कामगिरी
नीरा दि.११ - राहुल शिंदे
कर्नलवाडी येथील तरुण शेतकरी विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे या दोघ बंधूंनी पाण्याच्या कमतरतेवर मात करत कर्नलवाडी येथील शेतात स्वीटकॉर्न मक्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. तिनं महिन्याच्या या पिका मध्ये त्यांना 1 लाख 16 हजाराचे उत्पादन मिळाले आहे. तर 98 हजाराचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे.
कर्नलवाडी म्हणजे कायम पाणी टंचाई असणार गाव. अनेक वर्ष या गावातील लोकांनी दुष्काळ पहिला आहे.गावात शेती करण्या पेक्षा पुण्या मुंबईला जाऊन कोणतीतरी नोकरी करावी आणि आपले कुटुंब चालावाव हा शिरिस्ता अनेक वर्ष पासून या गावात सुरू होता. पण आता शहरातही नोकऱ्या मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे येथील.शिकलेला तरुण आता आपल्याच शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतातील उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे.कर्नलवाडी येथील विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे हे सुद्धा आपली शेतात वेगवेगळे प्रयोग नेहमीच करीत असतात.या पूर्वी त्यांनी डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतले होते.अगदी परदेशी बाजारात त्यांनी डाळिंब पाठवले .मात्र मागील दोन वर्षाच्या काळात या भागात जास्तीचा पाऊस झाला आणि तेली रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे सर्वांनाच डाळिंबाच्या बागा काढाव्या लागल्या.
यानंतर आता त्यांनी आपल्या शेतात स्वीटकॉर्नच्या मक्याचे उत्पादन घेतले आहे.त्याचे हे पीक काढणीला आले असून व्यापाऱ्यांनी त्याची जागेवरच खरेदी केली आहे.विशेष म्हणजे. १२ हजार रुपये टन असा दर त्यांना मिळाला आहे. ८ ते १० टन उत्पन्न यातून मिळेल असा त्यांना अंदाज आहे. यातून त्यांना ८ टन उत्पादन. मिळाले तरी ११६००० उत्पन्न मिळेल.तर त्यांना या पिकासाठी आज अखेर १७५०० रुपये खर्च आला आहे.यातून त्यांना ९८ हजाराचे निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. दोन दिवसात हे पीक काढले जाणार आहे.मकेची कणसे गेल्यानंतर राहिलेली मका जनावरांसाठी चारा म्हणून वापरली जाते. तिला एक पांड मकेसाठी १ हजार दर मिळत आहे.
विराज निगडे ( शेतकरी )
या पिकाला हमी भाव आहे. एका कंपनी बरोबर याबाबतचा करणार आम्ही केला आहे.साधारण ८ ते १० टन एकरी उत्पादन निघते.कंपनीने १२ ते १५ हजार भाव देण्याची हमी दिली आहे.दाराची हमी असल्याने व कामी कालावधीत हे पीक येत असल्याने आम्ही या पिकाला प्राधान्य दिले. यावर्षीचा आमचा हा पहिलाच प्रयोग आहे आणि या पासून जनावरांना चारही उपलब्ध होतो आहे.
निगडे यांनी तीन हजाराचे स्वीटकॉर्नच्या बियाण्याची एक एकरावर लागवड केली.त्याला ४ चार हजाराचे रासायनिक खत वापरले यामध्ये युरिया,सुफला १०:२६:२६ समावेश होता.९० दिवसात हे पीक काढणीस आले आहे.विशेष म्हणजे त्यांना यावेळी रासायनिक औषधांचा वापर करण्याची गरज भासली नाही.पाणी कमी असल्याने त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला.