पुरंदरमध्ये कोराना रुग्ण.
नीरा : दि. २८
पुरंदर तालुक्यात कोव्हिड रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात यापूर्वी दोन रुग्णांचे अहवाल बाधित आले असुन, आता सुपे (खुर्द) येथील एक युवकाचा सोमवारी कोरोना बाधित अहवाल आला आहे.
मागील आठवड्यात सासवड शहर व वनपुरी येथे प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल कोरोना बाधित आला होते. ते दोघे आता पुर्ण बरे झाले असुन, सोमवारी पुण्यातील सिरम कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तपासणी कंपनीत करण्यात आली होती. या दरम्यान पुरंदर तालुक्यातील पानवडी रोडवरील सुपे (खुर्द) येथील एक व्यक्तीचा अहवाल बाधित आला आहे. त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसून तो होम आश्युलेशन मध्ये आहे. त्यांच्या संपर्कातील १३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी दिली आहे.