नायगाव सोसायटीच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न
नायगाव दि.१७
पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नायगाव या सोसायटीच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम नुकताच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ प्रा दिगंबर दुर्गाडे,आमदार संजय जगताप,माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले सोसायटीच्या इमारती साठी कर्ज उपलब्ध करून देऊ.नाबार्डच्या माध्यमातून काही योजना राबवू जेणे करून सोसायटीवर त्याचा बोजा पडणार नाही.पात्र शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचे आहे ते लवकरच मिळेल.शेतकऱ्यांना मिळणारी ६ टक्के व्याज रक्कम ह्या मध्ये केंद्र सरकार ३ टक्के व राज्य सरकार ३ टक्के आशी मिळते परंतु केंद्र सरकारचे ३ टक्के रक्कम न मिळाल्यामुळे राज्य सरकारची ३ टक्के रक्कम देणे बाकी आहे.तीही लवकर मिळेल.प्रत्येक तलावा पर्यंत पाईपलाइन आणणार आहे.नायगाव मधील राहिलेली कामे लवकरच पूर्ण करू.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ प्रा दिगंबर दुर्गाडे म्हणाले गुगल पे,फोन पे सुविधा लवकरच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देणार आहे.मोबाईल ए टी एम गाडी फिरणार आहे.शिक्षणासाठी अतिशय कमी दरात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज देते.हा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. इतरही कर्ज योग्य दरात दिली जातात.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा साहेब,ताई,दादा यांचा आग्रह असतो.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेणार आहे.
यावेळी नायगाव सोसायटीचे अध्यक्ष संदिप खेसे,सिद्धेश्वर सोसायटीचे अध्यक्ष दादा चौंडकर,सरपंच बाळासाहेब कड,नायगाव सोसायटीचे संचालक विलास खेसे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रदीप पोमण,सुनीता कोलते,गणेश जगताप,माऊली यादव,संभाजी काळाणे, देविदास नाझीरकर,विकास इंदलकर, जयेश गद्रे,मंगेश घोणे, संतोष गिरमे,संभाजी जगताप,धनंजय निरगुडे, बापू मुळीक तसेच सोसायटीचे संचालक,
गावातील पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन नायगावचे माजी सरपंच हरिदास खेसे यांनी केले.