लग्नाच्या पहिल्याच रात्रीच नवरीन नवरदेवाला दिला मोठा झटका. सत्य समजताच नवरदेव हादरला
नवी दिल्ली दि.२३
आपल्याकडे समाजात लग्नाला खूप शुभ मानले जाते. ज्या घरांमध्ये लग्नं होणार आहे, तिथे आनंदाचं वातावरण असतं. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात इतकं काम असतं की लोक रात्रंदिवस व्यस्त असतात.
लग्नाच्या काही दिवस आधी वधू-वरांच्या घरी मंगल गीते सुरू होतात. घरे सजवली जातात. पाहुण्यांची कोणतीच तक्रार नसावी म्हणून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. दुसरीकडे, वधू आणि वर पहिल्या रात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात.
भेटीची पहिली रात्र संस्मरणीय करण्याचा दोघांचा प्रयत्न असतो. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाला धोका मिळाला तर त्याची काय अवस्था होईल? अशीच एक घटना इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली.नवरीकडील लोकांनी कट रचून हे लग्न लावलं होतं.
दलालाने त्या व्यक्तीचं लग्न ठरवलं. ठरलेल्या तारखेला रीतिरिवाजांसह विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या दुसर्या दिवशी, वर आपल्या वधूसह नवीन जीवन सुरू करण्यासाठी उत्सुक होता. मात्र नवविवाहित वधूने वराला सांगितलं की तिला मासिक पाळी सुरू झाली आहे, त्यामुळे ती शारीरिक संबंध ठेवू शकत नाही.
मात्र लग्नानंतर सात दिवसांनी भलतंच सत्य समोर आलं. 7 दिवसांनंतर नवरी फरार झाली. तपास केला असता ती लग्न जमवलेल्या दलालाच्या घरात आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळली. यानंतर हे सगळे तिथूनही फरार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तरुणाचं लग्न संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था राखून पार पडलं. लग्नानंतर नवरीने बहाणा सांगत नवरदेवाला जवळ येऊ दिलं नाही. लग्नानंतर सुमारे 7 दिवसांनी ती सोन्याचे मंगळसूत्र, टॉप्स तसेच चांदीचे दागिने आणि 3 लाख रुपये रोख घेऊन फरार झाली. वास्तविक, ती लुटेरी वधू होती, जिने लग्न करून दरोडा टाकला आणि नंतर दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला.
वधू अचानक बेपत्ता झाल्यानंतर वर आणि त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. घराची तपासणी केली असता दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे आढळून आले. यानंतर संतप्त झालेल्या नवरदेवाकडील लोकांनी थेट लग्न ठरविणाऱ्या एजंटचे घर गाठले. तिथे नववधू दलालासोबत त्याच खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. यामुळे वराच्या आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. या सर्वांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामागे मोठी टोळी असल्याचे पोलिसांनी सांगितले.