हुर्रे संप मिटला!!! मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप घेतला मागे.....!
मुंबई दि.२०
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांना दिलेल्या लेखी आश्वासन नंतर राज्यात मागील सात दिवसापासून सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेसाठी ही खरतर आनंदाची बातमी आहे.कारण या संपामुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथर शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे गेले सात दिवस सुरू असणारा संप मागे मागे घेण्यात आला आहे,याबाबतची धोषणा विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन लागू करण्यासंदर्भात सहकार्य करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी समितीला सहकार्य करावे असं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर सरकारने याबाबत लेखी आश्वासन सुद्धा दिला आहे त्यामुळे हा संप मागे घेण्यात आल्याचे काटकर यांनी सांगितले त्यामुळे आता उद्यापासून सर्व कर्मचारी कामावर येतील आणि जनतेची कामे पुन्हा सुरू होतील अशी आशा आता जनतेला लागली आहे. उद्यापासून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आवाहन विश्वास काटकर यांनी केले आहे.
सात दिवस चाललेल्या संपाचा कालावधी हा अर्जित रजेत वर्ग केला जाणारा असून तो कालावधी नियमित केला जाणार आहे. तसेच संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले.