Type Here to Get Search Results !

अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच

 अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच 



नवी दिल्ली दि १९



     पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पंजाब पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी राज्यात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे.


शनिवारी 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो पोलिसांच्या हातून निसटण्यात यशस्वी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता एक नवीन एफआयआर दाखल केला आहे.


पोलिसांनी पहिल्यांदा २३ फेब्रुवारी रोजी अजनालाप्रकरणी अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी शनिवारी त्याच्या सात सहकाऱ्यांना जालंधरच्या मेहतपूरजवळ ताब्यात घेतलं. त्या सात जणांना आता २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.


अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. अवैधरितीने शस्त्र बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद झाला. अमृतसर (ग्रामीण)चे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सतिंदर सिंह यांनी सांगितलं की, अमृतपालचे सात सहकाऱ्यांना शस्त्र अधिनियमातील तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे.


एसएसपी यांनी सांगितलं की, आम्ही काल रात्री शस्त्र अधिनियमांतर्गत एक नवीन एफआयआर दाखल केला. यामध्ये अमृतपाल मुख्य आरोपी आहे. शनिवारी अमृतपालच्या ७८ सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र अमृतपाल अजूनही फरार आहे. सलग तिसऱ्या दिवशी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


दरम्यान, अमृतपालचे वडील तरसेम सिंग यांना अमृतपाल संदर्भात विचारले असता, त्यांना त्यांचा मुलगा कुठे आहे हे माहिती नसल्याचे स्पष्ट सांगितलं. तसेच, मला स्वतः अमृतपालबद्दल काही योग्य माहिती मिळवायची आहे. पोलिसांनी त्यांच्या घरात ३ ते ४ तास शोधमोहीम राबवल्याचे त्यांनी सांगितले.


अमृतपालच्या अटकेची माहिती शनिवारी दुपारी आली, मात्र पोलिसांनी रात्री उशिरा काढलेल्या अधिकृत प्रेस स्टेटमेंटमध्ये तो फरार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी 'वारीस पंजाब दे' संघटनेशी संबंधित 78 जणांना अटक केली आहे.

पंजाब सरकारकडून एक निवेदन देण्यात आलं आहे. 


इंटरनेट सेवा ही केल्या बंद 


सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने, पंजाबच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रात सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाईल रिचार्ज वगळता) आणि व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर प्रदान केल्या जाणाऱ्या सर्व डोंगल सेवा १८ मार्च ते १९ मार्च पर्यंत बंद केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies