Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ बालाजी जाधव यांची निवड

 छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ बालाजी जाधव यांची निवड स्वागत अध्यक्षपदी प्रशांत पाटणे निमंत्रकपदी सुनील धिवार व सचिन भोंडे : दशरथ यादव यांची माहिती



सासवड, ता. ४ः राज्य स्तरीय १४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डाॅ बालाजी जाधव यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी प्रशांत पाटणे यांची निमंत्रकपदी सुनील धिवार व सचिन भोंडे यांची निवड करण्यात आली आहे, उदघाटक म्हणून शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्यसंयोजक व प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.


 मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने दरवर्षी सासवड (ता.पुरंदर) येथे १२ मार्च रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनाचे हे १४ वे वर्षे आहे.



 डॉ जाधव इतिहासाचे अभ्यासक असून त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत, औरंगाबाद येथे पंचफुला प्रकाशन चालवीत आहेत, 


स्वागताध्यक्ष प्रशांत पाटणे पुरंदर प्रतिष्ठान चे अध्यक्ष असून, पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, व्याख्याने, ग्रंथालय चळवळ, विविध उपक्रम ते राबवीत असतात, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात, निमंत्रक  सचिन भोंडे सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत, 


संमेलनाचे अध्यक्ष पदाचा मान यापुर्वी इतिहास संशोधक अँड अनंत दारवटकर, डाँ प्रभाकर ताकवले, प्रा. नामदेवराव जाधव, अ.रा.कदम, प्रा.गंगाधर बनबरे, बाबासाहेब सौदागर, श्रीराम पच्छिंद्रे, शरद गोरे, डॉ जयप्रकाश घुमटकर, डाँ.भा.ल.ठाणगे, गुलाब वाघमोडे यांना मिळाला आहे. 


आचार्य अत्रे सांस्कृतिक नाट्यगृहात संमेलन होणार आहे, सकाळी ११ वाजता ग्रंथपूजन दुपारी १२ वाजता संमेलन उद्घाटन, पुरस्कार वितरण समारंभ होईल, दुपारी २ वाजता साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज या  विषयावर परिसंवाद असून, सायंकाळी ४ वाजता कविसंमेलन आणि समारोप समारंभ होईल, 

संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, भारतीय जनता पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे आदी उपस्थित राहणार आहेत, 


संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, शामकुमार मेमाणे, नंदकुमार दिवसे, दत्ता भोंगळे, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, दत्ता कड, संजय सोनवणे, दीपक पवार, विजय तुपे सुरेश वाळेकर आदी करीत आहेत,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies