आंतरजातीय विवाह करा आणि बना सरकारचे जावई
मिळणार 10 लाख रुपये हुंडा
नवी दिल्ली दि.24
आपली भारत देशात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना नेहमीच विरोध केला जातो. आजही जात किंवा धर्माबाहेर लग्न केल्यामुळे अनेक समाजात आणि कुटुंबात वाद होतात. किंवा अशावेळी मुला मुलींची हत्या देखील केली जाते पण आता हा विवाह झाल्यास मोठी रक्कम त्या जोडप्याला मिळणार आहे.आणि त्यामुळे समाजाने नाकारले तरी नवं जोडप्याचा रोजी रोटीचा प्रश्न मिटणार आहे.
पण सामाजिक समता आणि सलोखा राखण्यासाठी त्याच बरोबर अस्पृश्यता निर्मुलनासाठी सरकार काम करत आहे. राजस्थानमध्ये आंतरजातीय विवाहाला देण्यासाठी प्रोत्साहन रक्कम 10 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही रक्कम 5 लाख रुपये होती.
राजस्थानमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागातर्फे संचालित डॉ. सविता बेन आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना अंतर्गत, आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन रक्कम आता 10 लाख रुपये करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रक्कम वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत 8 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या जातील. उर्वरित 5 लाख रुपये संयुक्त बँक खात्यात जमा केले जातील. 2023-24 च्या अर्थसंकल्पात गेहलोत यांनी या संदर्भात घोषणा केली होती.