नीरा येथील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर खा. सुप्रिया सुळे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत.
निर्भयपने, गैरमार्गाचा वापर न करता पेपर लिहिण्याचा दिला संदेश.
नीरा :
नीरा (ता.पुरंदर) येथील एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर खा. सुप्रिया सुळे व पुरंदरे आमदार संजय जगताप यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. निर्भीडपने पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका, पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ्या. कोणत्याही प्रकारच्या शंका मनात न ठेवता विद्यार्थ्यांनी निर्भयपने व गैरमार्गाचा वापर न करता परीक्षा द्यावी असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
नीरा येथील महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावर १७२ मुले, १७९ मुली असे एकुण ३५१ विध्यार्थी परीक्षा देत आहेत. तर सौ. लिलावती रिखावलाल शहा कन्या शाळा व महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे येथील विध्यर्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा.दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, लक्ष्मणराव चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दोन्ही कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार भोसले, निवेदिता पासलकर, पर्यवेक्षक सतिश निगडे, उत्तम लोकरे त्याच बरोबर शिक्षक, होमगार्ड पोलीस कर्मचारी उपस्थित होते.