Pathaan Movie Song Besharam Rang Steal From Sajjad Ali : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या शाहरुख हा 'पठाण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.
सज्जाद अली यांनी 'बेशरम रंग' गाण्याविषयी मोठा खुलासा केला
आहे. 'बेशरम रंग' हे गाणं त्याच्या 'अब के हम बिछडे' या बरीच वर्षे जुन्या असलेल्या
गाण्यासारखे आहे. त्यांनी 'पठाण' चित्रपटाचे किंवा त्याच्या निर्मात्यांचे किंवा मग गाण्याचे
नाव न घेता चोरीचा आरोप केला आहे. सज्जाद अली यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम
अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते एका आगामी चित्रपटातील गाणं ऐकत
असल्याचे सांगत आहेत. हे ऐकताना त्यांना 25-26 वर्षांपूर्वीच एक गाणं त्यांना
आठवल्याचे सांगितले आहे.