रॉकेट टाकून एकाला पेटवून देण्याचा प्रयत्न :पुरंदर तालुक्यातील घटना
नीरा दि.८
इतिहासामध्ये ' काका मला वाचवा' असं आपण वाचले आहे. पण पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे 'काका मला मारू नका' असं म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आली आहे.. वागदरवाडी येथील काका पुतण्याचं जमिनीवरून वाद आहे . पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या अंगावर मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या पुतण्याची आई सुद्धा यामध्ये किरकोळ जखमी झाली आहे.
यासंदर्भात जेजुरी पोलिसात भारतीय दंड विधान कलम 307,324,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वागदरवाडी येथील शारदा नानासाहेब भुजबळ या महिलेन याबाबत फिर्याद दिली आहे . तीने दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी हिं घटना घडली आहे.. त्यांचा दिर आरोपी भास्कर त्रिंबक भुजबळ यांनी त्यांचा मुलगा स्वप्नील नानसो भुजबळ यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर पेटत्या टेभ्याने त्याला मारहाण केली.. या काका पुतण्याच जमिनीवरून भांडण आहे. काकाने पुतण्याच्या जमिनीत अतिक्रमण करून ऊस लावला आहे.त्या ऊसाला तोड आल्यावर पुतण्याने हरकत घेतली .मात्र तरी देखील काकान ऊस तोडन्याचा प्रयत्न केला .ही ऊस तोड थांबवण्यासाठी पुतण्या आणि त्याची आई शेतात आले असता ही घटना घडली. याबाबतचं अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक कुंडलिक गावडे करीत आहेत.