राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपूर्वी वादात अडकले होते. कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाच्या उद्घाटनाच्यावेळी विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने आव्हाड यांच्यावर केली होती.
दरम्यान रविवारी आव्हाड यांनी एक
भावनिक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात की, 1997 साली आई सोडून गेली, 2017 साली बाबा सोडून गेले त्यानंतर 2022 मध्ये पोलिसांनी राजकीय दबावापोटी माझ्यावर खोटी विनयभंगाची
तक्रार केली. त्यामुळे ही तीन वर्षे माझ्या कायमची लक्षात राहतील. जखम हृदयावर
आहे. आता ह्या नंतर मला किती ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, काही संगता येत नाही. सत्य परेशान हो सक्ता हैं, पराजीत नही.