Type Here to Get Search Results !

दिल्ली हादरली! भल्या पहाटे पाच तरुणांनी तरुणीला चार किमी फरफटत नेले; पाय तुटून पडले, कपडे गळून गेले

 


विवारी पहाटे राजधानी दिल्लीला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नववर्षाच्या स्वागतात लोक रमलेले असताना कारमधून जाणाऱ्या पाच तरुणांनी एका तरुणीला चार किमीपर्यंत फरफटत नेले.

यामध्ये या तरुणीचा मृत्यू झाला आहे.

ही घटना एवढी धक्कादायक होती की रस्त्यावरून घासत घासत नेल्याने तरुणीच्या मृतदेहाची चाळण झाली होती. एका तरुणाने हा प्रकार पाहिला आणि पोलिसांना याची फोनवरून माहिती देत राहिला, परंतू पोलीसही एवढे निर्ढावलेले की माहिती मिळूनही घटनास्थळी आले नाहीत. प्रत्यक्षदर्शी दीपकने हा दावा केला आहे.

दीपकने सांगितले की, बेगमपूरपर्यंत त्याने त्या कारचा पाठलाग केला. पीसीआर व्हॅनमध्ये असलेले पोलीस कर्मचारी शुद्धीत नव्हते. यामुळे त्यांनी दीपकचे म्हणणे एकून घेतले नाही. त्या तरुणीचा मृतदेह जोपर्यंत कारला अडकला होता तोवर ते लोक कार इकडे तिकडे फिरवत राहिले. जेव्हा मृतदेह पडला तेव्हा ते तेथून कारसह पसार झाले.

कार कमी वेगात होती आणि ती चालवणारी व्यक्ती सामान्य असल्याचे दिसत होते. पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दीपक दूध वितरणाची वाट पाहत होता. त्यावेळी त्याला एक कार येताना दिसली. त्या गाडीच्या मागच्या चाकांमधून मोठा आवाज येत होता.

डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, रविवारी पहाटे तीन वाजता पोलिसांना कांझावाला परिसरात पीसीआर कॉल आला. रस्त्याच्या कडेला एक मुलगी विवस्त्र अवस्थेत पडल्याचे सांगण्यात आले. या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता, एक 23 वर्षीय तरुणी स्कूटीवरून आपल्या घराकडे जात असताना कारसोबत अपघात झाला. ती कारमध्ये अडकली. या कारने तिला चार किमीपर्यंत घसटत नेले. यामुळे तिचे कपडे फाटून वेगळे झाले. पोलिसांनी कारमधील पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

मुलीचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. अंगावर एकही कपडा नव्हता. रस्त्यावर ओढले गेल्याने मुलीचे पाय तुटून गेले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies